दारवली रस्ता बनला भ्रष्टाचाराचे कुरण

डान्सिंग कारच्या रस्त्याची गेल्या १५ हुन अधिक वर्षांपासून दुरावस्था 

पौड : पौड ते भरे मार्गावरील दारवली गावचा रस्ता हा कायम दुर्लक्षित राहिला आहे. सतत ठराविक वर्षांनी या रस्त्यावर निधी पडत असतोमात्र काही महिन्यातच अवस्था "जैसे थे" अशीच असते. त्यामुळे हा दारवली रस्ता भ्रष्टाचाराचे कुरणच बनला आहे, असे वाटते. या रस्त्याइतके खड्डे तालुक्यात दुसऱ्या कोणत्या रस्त्यावर असतील, असे वाटत नाही. या रस्त्यावरच्या प्रचंड संख्येत असलेल्या खड्ड्यांमुळे या रस्त्याला डान्सिंग कारचा रस्ता म्हणावे लागते.

    अंबडवेट मार्गे पौडकडे जाताना दारवली गाव येण्यापूर्वी सिमेंटच्या रस्त्याआधी या खड्डयांची झलक पहायला मिळेल. आजही हा रस्ता नव्याने केला असला तरी काही महिन्यातच यावर पुन्हा प्रचंड खड्डे पडले आहेत. हे खड्डे आणि पूर्वी अनेकदा झालेली या रस्त्याची कामे हा रस्ता भ्रष्टाचाराचे कुरण झालेले स्पष्ट दाखवून देत आहे.

    नुकतेच काही महिन्यापूर्वी झालेल्या नव्या रस्त्यावर आत्ता भले मोठे आणि मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यावर सार्वजनिक बांधकाम विभागाला विचारले असता त्यांनी सांगितले की या रस्त्यावरचा वरच्या थराचा सिलकोट राहिल्यामुळे खड्डे पडले आहेत. पाऊस थांबल्यावर हे खड्डे बुजवून त्यावर सिलकोट केला जाणार आहे. खालच्या थराला ठिगळे मारून वरचा सिलकोट मग किती दिवस टिकणार आहे? यावरून सरळ सरळ समजतंय की जनतेचा पैसा पाण्यात चाललाय. यावर कोणताही लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाही. "मौनात सर्वार्थ साधनम" अशी लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याची भूमिका दिसत आहे.

    याऊलट जागरूक नागरिकांनी तसेच समाजसेवक लोकप्रतिनिधींनी या रस्त्यावर मागच्या किमान दोन तीन वेळा झालेल्या कामाच्या चौकशीची मागणी लावून धरली पाहिजे. रस्ता का टिकला नाही व का टिकत नाही, अवघ्या २-४ महिन्यातच या रस्त्याची खांडोळी का होत असते याच्या चौकशीची मागणी केली पाहिजे. दारवली ग्रामस्थांनी तसेच मुळशीकरांनी यावर तीव्र आंदोलन उभारले पाहिजे.

जिकडे तिकडे चहूकडे खड्डेच खड्डे - भरे पॉव्हर हाऊस जवळील रस्त्याची दुर्दशा

..............................................................................................................................................

(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला लाईक करा.)

तसेच आमच्या Whats app ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला click करा. 

https://rb.gy/aeqs0k