सुतार समाजाचा स्नेह मेळावा व पदाधिकारी निवड

मारूंजी : अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघातील पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ व स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मुळशी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची निवड व त्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.

    यावेळी महासंघाच्या आधारस्तंभ प्रतिभाताई ज्ञानेश्वर भालेराव, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय सुतार, उपाध्यक्ष दिलीप आनंदे, कार्याध्यक्ष चंद्रकांत कदम, मेडिकल असोसिएशन अध्यक्ष विद्यानंद मानकर, पुणे जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भागवत, उपाध्यक्ष रवींद्र यादव आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

    यावेळी अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघाच्या मुळशी तालुका अध्यक्षपदी संदीप नारायण यादव यांची, उपाध्यक्षपदी सचिन महाडिक, कार्याध्यक्षपदी गोरख कदम, खजिनदार विजय पवार सचिव प्रवीण रायरीकर, सहसचिव कृष्णा बाळु केदारी तसेच सर्व मुळशी तालुका पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली.

    याप्रसंगी महासंघाचे सर्व विश्वस्त, प्रदेश सरचिटणीस किशोर भाऊ कदम,  पुणे जिल्हा कार्यकारी व सर्व तालुके कार्यकारी मान्यवर उपस्थित होते. सुतार समाजातील विविध प्रश्न, समस्या, मार्गदर्शन यावर आपण करत राहू असे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

..............................................................................................................................................

(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स' सोबत Connected रहा.)

FACEBOOK, फेसबुक  Click Blue Line

Follow us on INSTAGRAM   इन्स्टाग्रामला फॉलोव्ह करा  Click Blue Line

आमच्या चॅनेलला Follow करा.  Click Blue Line.