मराठवाडा दुष्काळग्रस्तांना योग्य मदत व शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेचे आंदोलन

राज्य शासन खोटा नरेटीव्ह पसरवत असल्याचा आरोप

पौड : मराठवाडा दुष्काळग्रस्तांना योग्य ती नुकसान भरपाई मिळावी, तसेच संपुर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मुळशी तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मागणी करण्यात आली. यासाठी तालुकाप्रमुख सचिन खैरे यांच्या नेतृत्वाखाली पौड, ता.मुळशी येथे आंदोलन करून मागण्यांचे निवेदन तहसील कार्यालयात देण्यात आले.

     नुकतेच जाहीर केलेल्या ३१ हजार ५०० कोटीच्या पॅकेज मधून शेतकऱ्यांमध्ये खोटा नरेटीव्ह पसरण्याचे काम राज्य सरकारने केले आहे. या आंदोलनात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने ५० हजार रुपये हेक्टरी मदत मिळावी. बळीराजाची सरसकट कर्जमुक्ती करावी. तसेच शेतकऱ्यांची मूळ मागणी हेक्टरी सरसकट ५० हजार रुपये नुकसान भरपाई, सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती, पिक विम्याचे निकष पूर्ववत करावे. पुरात वाहून गेलेल्या घरांची, जनावरांची व दुकानांची आर्थिक भरपाई मुबलक प्रमाणात मिळावी, या मागण्या मान्य केल्या तरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल यासाठी पौड तहसिल येथे आंदोलन करण्यात आले.

     यावेळी पुणे जिल्हा संपर्क संघटिका स्वाती ढमाले, शिवसहकार सेनेचे ज्ञानेश्वर डफळ, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नामदेव नामदेवआप्पा टेमघरे, हनुमंत सुर्वे, विंद सरुसे, दिलीप गुरव, उपतालुका प्रमुख अनंता वाशिवले, लहू लायगुडे, पांडुरंग निवेकर, तालुका संघटिका सुप्रिया सरूसे, सुमन जोरी, कावेरी साठे, प्रशांत जोरी, दिलीप मारणे, सचिन मारणे, शिवाजी बलकवडे, नितीन साठे, योगेश काशीलकर, पंकज भिडे, धर्मा फाले, हरी दुर्गे, तानाजी भोईने, अशोक जोरी, नितीन लोयरे, सचिन सावंत, नवनाथ नलावडे, संतोष लोयरे तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

..............................................................................................................................................

(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला लाईक करा.)

तसेच आमच्या Whats app ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला click करा. 

https://rb.gy/aeqs0k