महाराजस्व अभियानातंर्गत सेवा पंधरवड्याचे आयोजन, तहसिलदार विजयकुमार चोबे यांची माहिती
पौड : मुळशी तालुक्यातील पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त व
खुले होणार असून त्यासंदर्भात कार्यवाही आखण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत
मुळशी तहसिलदार कार्यालयाकडून सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आलेले
असून हे अभियान तीन टप्प्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती मुळशीचे तहसिलदार
विजयकुमार चोबे यांनी दिली आहे.
हा पंधरवडा १७ सप्टेंबर पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांचा वाढदिवस ते २ आँक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दरम्यान होणार
आहे. पहिल्या टप्प्यात १७ सप्टेबर ते २१ सप्टेंबर दरम्यान १४ मंडळातील २८ गवामधील पाणंद रस्ते गाव
नकाशावर सदर अ, ब, क, ड, ई असे मार्क करणार आहेत. गाव नमुना एकएफ मध्ये त्याची नोंद करून त्या रस्त्याचे
ग्रामसभेत वाचन केले जाईल व
त्याला मान्यता घेतली जाणार आहे. हे पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करणार असून रस्त्याच्या
दोन्ही बाजूला झाडे लावणार असल्याचे
तहसिलदार चोबे म्हणाले.
दुसरा टप्पा २३ सप्टेंबर ते २७
सप्टेंबर दरम्यान सर्वासाठी घरे ही संकल्पना राबवणार आहे. कातकरी समाजाला घरे देण्यासाठी कार्यक्रम राबविले असून त्याचा लाभ या समाजाला झाला आहे.
तिसरा टप्पा २८ सप्टेंबर ते २ आँक्टोबर दरम्यान १९९३ ची लक्ष्मी
योजना राबविण्यात येणार आहे. सातबारावर पूरूषाप्रमाणे महिलांनाही समसमान
अधिकार देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग
बांधवांचा सर्व्हे झालेला असून दिव्यांगांना शासकीय योजनेचा लाभ मिळतो की नाही
याची खात्री केली जाणार आहे. तरी या सेवा पंधरवड्यात
जास्तीत नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुळशी तहसिलदार विजयकुमार चोबे यांनी
केले आहे.
जिकडे तिकडे चहूकडे खड्डेच खड्डे - भरे पॉव्हर हाऊस जवळील रस्त्याची दुर्दशा
..............................................................................................................................................
(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला लाईक करा.)
तसेच आमच्या Whats app ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला click करा.