स्वर्गीय सतीश सुतार यांच्या स्मरणार्थ शालेय साहित्य वाटप

आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते ४०० विद्यार्थ्यांना साहित्याचे वितरण

पिरंगुट :  स्वर्गीय सतीश सुतार यांच्या स्मरणार्थ सुतारवाडी, ता.मुळशी येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी आमदार शंकर मांडेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

          जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सुतारवाडी ता. मुळशी जि.पुणे येथे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ४०० दप्तरे व प्रत्येक विद्यार्थ्याला ५ वह्या याप्रमाणे जवळपास १५०० फुलस्केप वह्यांचे वाटप करण्यात आले. 

          आमदार मांडेकर यांच्या हस्ते हे वाटप संपन्न झाले. तर या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम इंगवले, माजी सभापती बाबासाहेब कंधारे, मुळशीचे राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सुखदेव मांडेकर, माऊली कांबळे, सचिन अमराळे, विलास अमराळे, कासार आंबोली सरपंच माधुरी धुमाळ, एकनाथ सुतार, प्रकाश सुतार, शशिकांत नागरे, पोलीस पाटील स्वाती सुतार, निता नागरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश सुतार, माजी सरपंच गणेश सुतार, महेश मानकर, सुरज सुतार, समीर सुतार, आशिष वाडकर, उरवडे केंद्राच्या केंद्रप्रमुख वैजयंता देशमुख मॅडम, मुख्याध्यापिका ओहळे मॅडम तसेच सर्व शिक्षकवृंद , विद्यार्थी व इतर सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते. उबाळे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

          ढोल-ताशा गजरात आमदारांचे स्वागत करण्यात आले. शाळेतील विद्यार्थीनींनी भाऊंना औक्षण केले. तर शाळेतील कवी मनाचे शिक्षक मोहन भगत सर यांनी याच कार्यक्रमावर तयार केलेली स्वरचित कविता शाळेतील विद्यार्थीनीं पूर्वा खेडेकर हिने उत्तमरीत्या व गोड आवाजात सादर केली. शाळेचा वाढता पट पाहून मांडेकर यांनी शाळेतील सर्व शिक्षकांचे मनापासून कौतुक केले. शाळेला लागणारी मदत निवेदन स्वरूपात द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. शाळेला वेळोवेळी मदत करणारे कोटक एज्युकेशन फाऊंडेशनचे सानी सर व श्वेता मॅडम यांचा मांडेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

          कार्यक्रमासाठी योगेश सुतार, निलेश सुतार व सचिन सुतार यांचे मोठे योगदान लाभले. तसेच सोनेरी मुळशी मित्र परिवार, जय महाराष्ट्र मित्र मंडळ, सुतारवाडी व सर्व ग्रामस्थ यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

मुळशीत भातशेती धोक्यात, शेतकरी हवालदिल

सततच्या पावसामुळे ओल्या दुष्काळाच्या झळा

...............................................................................................................................................

(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला लाईक करा.)

तसेच आमच्या Whats app ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला click करा. 

https://rb.gy/aeqs0k