पौड : येथील नागेश्वर मंदिरामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने दुग्धाभिषेक करण्यात आला. मागच्या आठवड्यात या मंदिरात घुसून मूर्तीची विटंबना केली होती, त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी मंदिरात शंकराच्या पिंडीवर दुग्धाभिषेक केला.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख सचिन खैरे, युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव अविनाश बलकवडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सागर काटकर, भारतीय विद्यार्थी सेना जिल्हा संघटक राम गायकवाड, शिवसहकार सेना तालुका संघटक ज्ञानेश्वर डफळ, नागेश साखरे, हनुमंत सुर्वे, सोमनाथ बोडके, हिराबाई पडळघरे, अनंता वाशिवले, दत्तात्रेय गोरे, अमित पिंगळे, लालासाहेब साखरे, मयूर जाधव, सचिन सावंत, नितीन लोयरे, श्याम भेगडे, सदाशिव दळवी, हनुमंत ठकोरे, शिवाजी वाघवले, सुमीत सुपेकर, आशिष ढगे, मयूर रानवडे रावसाहेब पाटील, ज्ञानेश्वर पोळ, यश पिंगळे आदी पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, मुळशी तालुक्यातून विटंबना करणाऱ्या आरोपीविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून, आरोपीस कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. आत्तापर्यंत दोन मोर्चे या घटनेच्या निषेधासाठी झाले आहेत.
...............................................................................................................
(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला व इन्स्टाग्राम पेजला फॉलोव्ह करा.)