दिनांक २ मे २०२५ रोजी मुळशीतल्या पौड गावात नागेश्वर मंदिरात मूर्तीच्या विटंबनेची घृणास्पद घटना घडली. त्या घटनेविषयी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यासाठी पौडमधील केतन मखी, बाळासाहेब पवार, संजय घनवट, योगेश दळवी, रितेश जाधव, ओंकार उबाळे, मंगेश घनवट, तनीश भोकरे हे कार्यकर्ते मुख्यमंत्री कार्यालय मुंबई येथे गेले होते. युवकांनी मुख्यमंत्र्यांना घडलेला किस्सा इत्थंभूत सांगितला आहे.
मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण घटनेची माहिती विचारली आणि आरोपींना कडक शासन करण्याचे तसेच जे काही बेकायदेशीर आहे ते मुळासकट उखडून फेकून देऊ असे सांगितले. ही भेट घडवून आणण्यासाठी भाजपचे युवा मोर्चा अध्यक्ष सागरभाऊ मारणे यांनी महत्वाची भुमिका बजावल्याने पौड ग्रामस्थांतर्फे त्यांचे आभार मानण्यात आले आहे.
...............................................................................................................
(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला व इन्स्टाग्राम पेजला फॉलोव्ह करा.)