मुळशीचा निकाल 97.64 टक्के, मुलींचा देखील जिल्ह्यात अव्वल डंका
पौड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च
माध्यमिक मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत मुळशी
तालुक्याचा निकाल 97.64 टक्के लागला. विशेष म्हणजे पुण्यासारख्या विद्येच्या माहेर
घराशेजारी असलेल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची बाजी
मारत शैक्षणिक गुणवत्तेचा अनोखा मुळशी पॅटर्न निर्माण केला आहे. तर मुलींनी
तालुक्यातच नव्हे तर जिल्हयात अव्वल यश मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
तालुक्यातील 17 शाळांमधील विविध 16 शाखांचे निकाल शंभर टक्के लागले आहेत.
तालुक्यात
पौड,
पिरंगुट,
भूगाव,
हिंजवडी,
कासारआंबोली, ताथवडे, मारूंजी, भांबर्डे,
उरवडे,
बावधन,
माण या अकरा ठिकाणी कला, वाणिज्य, विज्ञान शाखेचे बारावीचे
वर्ग आहेत. तर,
पौड, पिरंगुट,
बावधनला व्यवसाय विभागाचे विविध अभ्यासक्रम शिकविले जातात. या सर्व शाळांमधून
1453 मुले आणि 1394 मुली अशा एकूण 2847 मुलांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
त्यात प्रत्यक्षात 2843 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 1406 मुले आणि
1370 मुली असे एकूण 2776 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांचे उत्तीर्णांचे प्रमाण
96.83 तर मुलींचे प्रमाण 98.49 टक्के आहे. पुणे शहर आणि जिल्ह्याच्या शेकडा
निकालात मुळशी तालुका उत्तीर्णांमध्ये अव्वल ठरला आहे. यात 360 विद्यार्थी विशेष
प्राविण्यात उत्तीर्ण झाले असून 917 विद्यार्थी प्रथम श्रेणीत , 1249 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर 250 विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण
झाले.
तालुक्यातील
विविध शाळांचे निकाल पुढीलप्रमाणे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, पौड (कला 100, वाणिज्य 96.42, व्यवसाय विभाग 100), पिरंगुट इंग्लिश स्कूल (कला 97.93, वाणिज्य 99.01, विज्ञान- 100, व्यवसाय विभाग 100), न्यू इंग्लिश स्कूल, हिंजवडी (कला 100, वाणिज्य 93.68), माध्यमिक विद्यालय भूगाव (वाणिज्य 95.65), राणी लक्ष्मीबाई सैनिकी
शाळा, कासारआंबोली (विज्ञान-100), बालाजी ज्युनिअर कॉलेज ताथवडे (विज्ञान- 94.21, वाणिज्य 98.05), मारूंजी विद्यालय (वाणिज्य 93.22. विज्ञान
98.21), संपर्क विद्यालय, भांबर्डे (वाणिज्य- 85.71), सूर्यदत्ता महाविद्यालय, बावधन (कला 100, वाणिज्य 94.28, विज्ञान 100, व्यवसाय विभाग-90), अनुसया ओव्हाळ विद्यालय (कला- 50, वाणिज्य-100), माध्यमिक विद्यालय उरवडे (वाणिज्य 94.44), चैतन्य ज्युनिअर कॉलेज
नांदे (विज्ञान-100), चाणक्य ज्युनिअर कॉलेज पिरंगुट (विज्ञान- 100, वाणिज्य 100), अकेमी ज्युनिअर कॉलेज (विज्ञान- 100, वाणिज्य - 100), साईबालाजी विद्यालय (विज्ञान 100, वाणिज्य 100), अलार्ड महाविद्यालय (विज्ञान 100, वाणिज्य 100).
...............................................................................................................
(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला व इन्स्टाग्राम पेजला फॉलोव्ह करा.)
