जिल्हाध्यक्ष आणि वरिष्ठ उपाध्यक्षांनी केले मार्गदर्शन
पौड : येथील काँग्रेस भवनमध्ये मुळशी तालुका कॉंग्रेसची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच निरीक्षक लहू अण्णा निवंगुणे, जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष संग्राम मोहोळ यांच्यासह इतर अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे, असे सांगितले. जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष संग्राम मोहोळ यांनीही कार्यकर्त्यांना संबोधित केले आणि संघटनात्मक प्रक्रियेबाबत आवश्यक सूचना दिल्या. उपस्थित मान्यवरांनी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाच्या बळकटीकरणासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी आगामी संघटनात्मक निवडीच्या दृष्टीने विविध पदांसाठी इच्छुकांनी आपली दावेदारी सादर केली आहे. मुळशी तालुका अध्यक्ष पदासाठी मोहन गोळे, सुरेश पारखी, अशोक मातेरे, मोहन झुंझुरके, मधुसूदन पाडाळे यांनी इच्छा दर्शवली असून युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष पदासाठी महेश मोहोळ, आशिष कांबळे, शाम शेळके, सौरभ गोळे यांनी तर ओबीसी काँग्रेस तालुकाध्यक्ष पदासाठी तानाजी मरगळे यांनी इच्छा दर्शवली आहे.
ही बैठक मुळशी तालुक्यातील कॉंग्रेस पक्षाच्या वाढीसाठी आणि संघटनात्मक बांधणीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल अशी अपेक्षा असून सर्व इच्छुकांनी आपआपले विचार मांडत संघटनेच्या बळकटीकरणासाठी कटिबद्धता दर्शविली. या बैठकीस यशराज पारखी, सतिश चांदेरे, सचिन किर्वे, अविनाश शिंदे, कुमार शेडगे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे व त्यांच्या समर्थकांनी काँग्रेस पक्षाच्या रामराम करत भाजप प्रवेश केल्यामुळे काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काँग्रेसला बळकटीकरणासाठी प्रयत्न चालवले आहेत, त्यानुसार बैठक व त्यातून पुढील मार्ग ठरवण्यात येत आहे.
...............................................................................................................
आमच्या Whats App ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला Click करा.
...............................................................................................................
(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला लाईक करा.)