मुळशीत अग्निशामक केंद्राचे काम कधी पुर्ण होणार?
पौड : मुळशीतील कोळवण येथील पोल्ट्री गोडाऊनला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने मोठी दुर्घटना घडली. सोमवारी दि.८ सप्टेंबर रोजी पहाटे ही घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही. अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग शर्थीने आटोक्यात आणली. कोळवण येथे डॉ.अजय देशपांडे
यांच्या मालकीची पोल्ट्री आहे. या पोल्ट्रीत एका बाजूला साहित्य
ठेवण्यासाठी एक गोडाऊन असून या गोडाऊनला राञी एकच्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे
आग लागली. यानंतर येथील कामगार संभाजी गुरव (मुळ रा.कोल्हापूर) यांनी
आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. तसेच तातडीने पौड पोलिसांनाही फोन केला. यानंतर अग्नीशामकची गाडी दाखल झाल्यानंतर आग विझविण्यात आली. यामध्ये खाद्याच्या चार हजार मोकळ्या पिशव्या, काही हिशोबाची पुस्तके
तसेच इतर साहित्य जळून खाक झाले. तर पशू असलेली पोल्ट्री लांब असल्याने याठिकाणी
कोणतीही जिवितहानी झाली नाही.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर कदम, पोलीस नाईक विराज
कामठे, हवालदार संतोष
गायकवाड, पोलिस कॉन्स्टेबल सुशांत गायकवाड, होमगार्ड वीटकर यांनी
याठिकाणी येऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.
मुळशीत
अग्निशामकचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
कासारआंबोली येथे अग्निशामक दलाचे स्टेशन
बांधकाम सुरू आहे. हे अतिशय संथगतीने सुरू असून तालुक्यात वारंवार जळीत घटना घडत
आहेत. घटना घडल्यानंतर दरवेळी अग्निशामक दलाच्या या संथ कामाची चर्चा होते व ती
विझूनही जाते. अनेकदा हे काम लवकर पुर्ण होईल असे आश्वासन व आशा मिळते मात्र काम
काय पुर्ण होऊन मुळशीकरांच्या सेवेत हे अग्निशामक दल येईना. सध्या कोथरूड, हिंजवडी
व मारूंजी येथून अग्निशामक दलाला बोलवावे लागते. त्यात वेळ जातो व आग विझवायला वेळ
गेल्याने मालमत्तेच नुकसान होते. त्यामुळे लवकरात लवकर अग्निशामक दल होण्यासाठी
शासनाने पाऊल उचलले पाहिजे.
..............................................................................................................................................
(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला लाईक करा.)
तसेच आमच्या Whats app ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला click करा.