खड्ड्यामध्ये झाड लावून केला निषेध, प्रशासनाचे कायमच दुर्लक्ष
मुठा : मुठा खोऱ्यातील मुठा ते लवासा रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवणे अवघड झाले आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असून मुळशी तालुका (उध्दव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेच्या पदाधिकार्यांनी खड्ड्यात झाड लावून निषेध व्यक्त केला.
मुठा ते लवासा रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी
साचून डबकी तयार झाली आहेत, त्यामुळे रस्त्यावर खड्डेही पडले आहेत. या
खड्ड्यांतदेखील पाणी साचल्याने वाहन चालवताना खड्ड्य़ांचा अंदाज लावता येत नाही. तर
अनेक पाण्याच्या डबक्यांमुळे रस्ताच दिसत नाही. परिणामी येथे वाहने चालवणे मोठ्या
जिकीरीचे ठरत असून वाहन चालकांना प्रचंड मोठ्या मनःस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
तसेच
रात्रीच्या वेळेस रस्त्यावर पथदिवे नसल्यामुळे छोटे-मोठे अपघात देखील होऊन यातून
मोठी दुर्घटना देखील होऊ शकते. या रस्त्याला चार कोटी खर्च करूनही ही दयनीय अवस्था
आहे. पावसाळ्यापूर्वी व त्यानंतरही बांधकाम विभागाने रस्त्याच्या बाजूने बांधकाम
विभागाने पाणी जाण्यासाठी कुठले ही नियोजन केले नाही. त्यामुळे पाणी रस्त्यावर येत
असून खड्डे पडत आहेत. विशेष म्हणजे या भागात मोठा प्रमाणात पर्यटक येत असतात, तरीही
या रस्त्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे रोडची अवस्था दयनीय
झाली आहे.
याचाच
जाहीर निषेध नोंदवत युवासेनेच्यावतीने रस्त्यात झाड लावुन आंदोलन करण्यात आले. यावेळी
युवासेनेचे उपजिल्हाअधिकारी अमित कुडले, विभाग
अधिकारी आकाश भरेकर, ग्रामपंचायत सदस्य खंडू उभे यांच्यावतीने
हे आंदोलन करण्यात आले.
...............................................................................................................................................
(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला लाईक करा.)
तसेच आमच्या Whats app ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला click करा.