कात्रज चौकातून मुळशीतल्या आंदगावला जाताना बसस्टॉपवरून गायब
कात्रज : दवाखान्यात जाऊन नंतर गावी जाते असे सांगून बाहेर पडलेली विवाहित महिला कात्रज येथून बेपत्ता झाली आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली असून तपास चालू आहे.
प्रज्ञा किरण मारणे (वय ३४, राहणार- मु.पो. आंदगाव ता. मुळशी जि. पुणे) असे विवाहित महिलेचे नाव आहे. दिनांक ५ जून दुपारी सव्वाबारा वाजल्यापासून ती कात्रज परिसरातून बेपत्ता झाली आहे. प्रज्ञा यांची उंची ५ फूट असून रंग सावळा आहे. तर अंगात निळा पंजाबी ड्रेस घातला असून सोबत निऑन ग्रीन रंगाची सॅक, गळ्यात सोन्याचे मंगळसूत्र, कानात सोन्याचे झुमके, व सोबत एक मोबाईल आहे. मोबाईल बंद लागत असून त्याचे लोकेशन तपासण्याचे प्रयत्न चालू आहेत. तो कात्रज परिसरातच बंद झाल्याचे आढळून आले आहे.
प्रज्ञा ५ जून रोजी भारती हॉस्पिटल याठिकाणी उपचारासाठी गेल्या होत्या. उपचारानंतर मूळगावी मुळशीच्या आंदगाव येथे जातेय असे सांगितले होते. गाव चांदणी चौकाच्या दिशेने असल्याने त्यांनी चांदणी चौकाकडे जाण्याचा विचार केला असावा, त्यानुसार त्या ५ जून दुपारी १ वाजता कात्रज बस स्टॉप परिसरात उपस्थित होत्या. मात्र बसस्टॉपपासून त्या हरवल्या आहेत. कोणाला काही माहिती असल्यास वा आढळल्यास पुढील क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
9970199188, 9175391908
...............................................................................................................................................
(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला लाईक करा.)
तसेच आमच्या Whats app ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला click करा.