नवचेतना युवा मंच व ग्रामीण विकास संस्था, पुणे यांच्यावतीने आयोजन
पौड : चाले, ता.मुळशी इथे कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या ३७५ व्या वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त ७ मे ते १२ मे या काळात कीर्तन महोत्सव होणार आहे. सोहळ्याचे आयोजन नवचेतना युवा मंच व ग्रामीण विकास संस्था, पुणे यांच्यावतीने ऍड.दत्तात्रय दहीभाते व जयवंत दहीभाते मित्र परिवाराकडून करण्यात आले आहे.
या
कीर्तन सोहळ्यात चाले येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दररोज संध्याकाळी कीर्तन
होणार आहे. यामध्ये ह.भ.प.भारतीताई गाडेकर, ह.भ.प.चैतन्य महाराज निंबोळे, ह.भ.प. श्रीकांत महाराज
सातकर, ह.भ.प.साध्वी सोनाली दीदी
करपे, ह.भ.प.राजेंद्र महाराज
दहीभाते, ह.भ.प.अनिल महाराज सावळे, ह.भ.प.जयेश महाराज
भाग्यवंत आदी मान्यवरांचे कीर्तन श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहे.
तसेच
१० तारखेला ११ आदर्श मातांचा सन्मान होणार असून तालुक्यातील विविध माता
सन्मानार्थी असणार आहेत. तर ११ तारखेला ह.भ.प.अनिल महाराज सावळे यांचे एकनाथी
भारुड हे विशेष आकर्षण असणार आहे. १२ तारखेला काल्याच्या किर्तनाने सोहळ्याची
सांगता होईल, अशी माहिती ऍड.दत्तात्रय दहीभाते, जयवंत दहीभाते, भाऊ केदारी, दिलीप लिंबळे यांनी दिली. तर यासाठी वारकरी
संप्रदयाचे विशेष सहकार्य लाभणार आहे.
...............................................................................................................
(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला व इन्स्टाग्राम पेजला फॉलोव्ह करा.)