सकल हिंदू समाजाचा तीव्र रोष, सोमवारी तालुका बंदची हाक, निघणार निषेध मोर्चा
पौड : हिंदू मंदिरातील देवीच्या मुर्तीची विटंबना झालेल्या घटनेचा मुळशी तालुक्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हिंदू समाजात यामुळे मोठा रोष पसरला असून शनिवारी पौडमध्ये मोर्चा काढण्यात आला व कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच सोमवारी मुळशी तालुका बंदची हाक देण्यात आली आहे.
शुक्रवारी दुपारी
पौड, ता.मुळशी येथील
नागेश्वर मंदिरात अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना मुस्लिम युवकाकडून करण्यात
आली. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर पसरल्याने तीव्र संतापाची लाट पसरली. त्यात
रात्री गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असताना कोणीतरी संतप्त युवकांनी पौडमधील
मशिदीच्या काचा फोडल्या. मूर्ती विटंबना घटनेतील आरोपी युवक चांद शेख व घटनेनंतर
धमकी देणारे आरोपीचे वडील नौशाद शाबाद शेख (वय ४४) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
केला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
ग्रामीण पोलीस
अधीक्षक पंकज देशमुख यांनी पौड पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित राहून घटनेची सखोल चौकशी
करून कार्यवाही व कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस उपअधीक्षक सुनील कुमार
पुजारी व पौड पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी देखील सखोल तपास करणार
असल्याचे सांगितले. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी कांबळे करत असून
पोलीस उपनिरीक्षक घुले यांनी गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेने दोन समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य करून सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस प्रशासनाने सतर्क राहून या घटनेमागचा मास्टरमाईंड शोधला पाहिजे. अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली होती. तर जागरूक नागरिकांनीही घुसखोर व समाजकंटक असलेल्या नागरिकांना थारा न देता, त्यांच्या उच्चाटनासाठी पोलिसांना सहकार्य करावे.
दरम्यान, पौड येथील नागेश्वर मंदिर व मशिदीला बंदोबस्त
ठेवण्यात आला असून पौड मध्ये पोलिसांचा जागता पहारा आहे. घोटवडे फाट्यावर सुरक्षा
जवान तैनात करण्यात आले आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कोणीही
कृत्य करू नये, केल्यास त्याला
गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल व कोणीही अफवा पसरवू नये असे पौड पोलीस निरीक्षक
संतोष गिरीगोसावी यांनी सांगितले.
सकल हिंदू समाजातर्फे पौडमधील घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी मुळशी तालुका बंदची हाक देण्यात आली असून सोमवारी सकाळी ८ वाजता लवळे फाटा येथून मोर्चाला सुरवात होणार असल्याचे जाहीर केले आहे. लवळे फाटा ते पौड या मार्गे हा मोर्चा निघणार असून नागरिकांनी याची दखल घ्यावी. तसेच हजारोंच्या संख्येने सामील होऊन विघातक प्रवृत्तींना विरोध करण्यासाठी सामील होण्याचे आवाहन सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आले आहे.
आरोपीचे वकीलपत्र न घेण्याचा पुणे बार असोसिएशनचा ठराव
पौड (ता. मुळशी) येथील नागेश्वर मंदिरात देवीच्या मूर्तीच्या विटंबना करणाऱ्या घटनेचा पुणे बार असोसिएशनने तीव्र विरोध करत वकील बांधवांनी आरोपींचे वकीलपत्र घेऊ नये, असा ठराव असोसिएशनतर्फे करण्यात आला. यावेळी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.हेमंत झंझाड, सचिव अॅड.भाग्यश्री गुजर-मुळे, ऑडिटर अॅड.केदार शितोळे, सदस्य अॅड.गणेश माने तसेच पौड बार असोसिएशनचे पदाधिकारी अॅड.संजय मारणे आणि अॅड.योगेश साठे आणि इतर सर्व वकील उपस्थित होते.
मंत्री नितेश राणे यांचा इशारा, तर आमदार महेश लांडगेंचे वादग्रस्त विधान
या विटंबना प्रकरणी मंत्री नितेश राणे यांनी त्यांच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून गर्भित इशारा दिला असून घटनेचा वायरल झालेला व्हिडीओ प्रसारित करून करारा जवाब मिलेगा असे म्हटले आहे. तर आमदार महेश लांडगे यांनी आरोपींना भर चौकात गोळ्या घालण्याचे वादग्रस्त विधान सोशल मिडीयाच्या माध्यमातून केले आहे.
मंदिरातील देवीच्या मूर्तीची विटंबना; संतप्त युवकांनी मशिदीच्या काचा फोडल्या
.............................................................................................................
आमच्या Whats App ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला Click करा.
...............................................................................................................
(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला व इन्स्टाग्राम पेजला फॉलोव्ह करा.)