पौडच्या मुस्लिम समाजाकडूनही मूर्ती विटंबना घटनेचा निषेध
पौड : पौड येथे झालेल्या अन्नपूर्णा देवीच्या
मूर्ती विटंबना प्रकरणी मुळशीत सोमवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. मुळशी
तालुक्यातील सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली होती. अत्यावश्यक सेवा जसे की हॉस्पिटल
व मेडिकल्स आणि पेट्रोल पंप व बँका या बंद मधून वगळण्यात आले होते.
पौड गावातून मोर्चा जात असताना विटंबना झालेल्या नागेश्वर मंदिरात जाऊन आमदार
शंकर मांडेकर व हिंदू बांधवानी अभिषेक घातला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या
पुतळ्याला व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून निषेध सभा
सुरू करण्यात आली. मान्यवरांनी भाषणातून निषेध व्यक्त केला. या दरम्यान मोर्चात एक
मुस्लिम माऊली देखील उपस्थित होती, हे विशेष.
मुळशीसह आयटी परिसरात बंदला पाठिंबा
मुळशीत भुगाव, पिरंगुट, पौड, घोटवडे सह आयटिपरिसरतील माण, हिंजवडी व इतर गावांमध्ये उत्स्फूर्त बंद
पाळण्यात आला. माण, हिंजवडीत बंदमुळे शुकशुकाट जाणवत होता. तर
पिरंगुट एमयडीसीमध्ये काही कंपन्यांनी कामगारांना सुट्टी दिली होती तर काही
कंपन्यांनी सोमवारच्या दिवशी अचानक सुट्टी जाहीर करून कामगारांना घरी जाऊ दिले.
पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने मोर्चा सुरळीत पार पडला. २०० ते ३०० पोलीस बांधव
मोर्चात बंदोबस्ताला उपस्थित होते.
(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला व इन्स्टाग्राम पेजला फॉलोव्ह करा.)