ग्रामपंचायत सुस महानगरपालिकेत समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेची आज पूर्तता, बावधन व म्हाळुंगेचाही समावेश
पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या मुळशीतील सुस गावचे हस्तांतरपत्र महानगरपालिका अधिकाऱ्यांनी स्वीकारले.
 पुणे : आज सुस ग्रामपंचायतची सर्व सूत्रे दफ्तर सहित पुणे महानगरपालिकेच्या स्वाधीन करण्यात आली. काल संध्याकाळी पुणे शहरा लगतची २३ गावे महानगरपालिका हद्दीत समाविष्ट करून घेण्याचा अंतिम आदेश निघाला होता. त्यानुसार आज लागलीच मुळशीतील सुस, बावधन, म्हाळुंगे गावच्या ग्रामपंचायतमध्ये मनपाच्या अधिकाऱ्यांनी येऊन दफ्तर ताब्यात घेतली. ती सर्व व्यवस्थित सील लावून बंद करण्यात आली आहेत. तसेच हस्तांतर पत्र स्वीकारून आता प्रशासकीयदृष्ट्या तीनही गावे महानगरपालिकेत समाविष्ट झाली आहेत.
             यावेळी सहाय्यक आयुक्त संजय आदिवंत, वरिष्ठ अभियंता आकाश डेंगे, अभियंता अस्मिता घुगे, लेखनिक सचिन सुतार, चिंतामणी नागरे व इतर सेवक यांनी ही शासकीय हस्तांतर प्रक्रिया पूर्ण केली. या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतचे सर्व दफ्तर ताब्यात घेतले असून त्यांना व्यवस्थित सील केले आहे. तर ताब्यात घेतलेले दफ्तर सोबत घेऊन महानगरपालिकेच्या कार्यालयाकडे नेले आहेत. 
               यावेळी विस्तार अधिकारी मोमीन साहेब, ग्रामसेवक बापूराव पिसाळ, देवकांबळे साहेब, सरपंच अपूर्वा निकाळजे, सदस्य सचिन चांदेरे, गणेश साळुंके, सर्व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, सर्व कर्मचारी आदी उपस्थित होते.
              महानगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ट होत असताना प्रशासकीय कारभार आता पुणे महानगरपालिकेच्या हातात गेल्याने सुस ग्रामस्थांनी 'थोडी खुशी, थोडा गम' या सूत्राने आपल्या प्रतिक्रिया दिल्या. त्यानुसार ग्रामस्थांना आता महानगरपालिकेच्या सुविधा सुरू होणार आहेत. तर या सुविधा लवकरात लवकर सुरू व्हाव्यात अशी ग्रामस्थांनी आशा व्यक्त केली आहे.

........................................................................................................................................

(मुळशीतील बातम्यांच्या अपडेटसाठी टेलिग्राम/Telegram ग्रुप जॉईन करा.)