पौड पोलिसांची सुपर कामगिरी, एकाच दिवसात विनामास्क ५७२ जणांकडून ७२ हजाराचा दंड वसूल


पौड :  मुळशी तालुक्यात शनिवारी पौड पोलिसांनी धुमधडाका कारवाई करत विनामास्क फिरणारऱ्यांना चांगलीच अद्दल घडवली आहे. तब्बल ५७२ जणांवर कारवाईचा बडगा उभारत तब्बल ७२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. यापैकी ४२७ नागरिकांवर भारतीय दंड संहिता कलम १८८ प्रमाणे गुन्हे दाखल केले असून १४५ नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक धुमाळ यांनी हिंजवडी टाईम्सशी बोलताना दिली आहे.


              कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विनामास्क फिरणे हा गुन्हा असून त्यावर कारवाईचे आदेश पुणे जिल्हाधिकारी यांनी पोलिसांना दिले आहेत. त्याच्या अंमलबजावणीसाठी पौड पोलिसांनी शनिवार दि.२९ ऑगस्ट रोजी भुगाव, पिरंगुट, भुकुम, घोटवडे, पौड, लवासा, मुळशी, आंबवणे, माले, घोटवडे फाटा,  कासार आंबोली, उरवडे, कोळवण या गावामध्ये ठिकठिकाणी चेकिंग पोस्ट उभारून विनामास्क फिरणारे नागरिक यांच्यावर कारवाई केली. नागरिकांनी सोशल डिस्टंस पाळावा, मास्क वापरावा, हात वेळोवेळी स्वच्छ करावे असे आवाहन पौड पोलिसांनी यावेळी नागरिकांना केले. यापुढेही विना मास्क फिरणाऱ्या व सोशल डिस्टन्स न ठेवणाऱ्या नागरिकांवर अशाच प्रकारची कारवाई चालू ठेवणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.


              पौड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक भालचंद्र शिंदे,  पोलीस उपनिरिक्षक रेखा दुधभाते, पोलीस उपनिरिक्षक अनिल लवटे, पोलीस उपनिरिक्षक श्रीकांत जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक राजेंद्र शितोळे, सिकंदर मुजावर,  पोलीस हवालदार संदीप सपकाळ, संतोष कुंभार, अब्दुल शेख, बाबा शिंदे, मंगेश लांडगे, विनोद कांबळे, सुनील मगर, रावसाहेब गायकवाड, शंकर नवले, पोलीस नाईक, सागर बनसोडे, विजय कांबळे, जय पवार, नितीन गार्डी, नंदू आडारी, नितीन कदम, चंद्रशेखर हगवणे, सातेंद्र वागवले, संजय सुपे, पोलीस शिपाई मयुर निंबाळकर, गणेश साळुंखे, नामदेव मोरे, सुहास सातपुते, रवींद्र जाधव, प्रशांत बुणगे, विनोद चोबे, सुनील कदम, नाना मदने, प्रशांत तुरे, महेश पवार, श्रीधर जगदाळे, मापोशी तृप्ती माकर या सर्वांनी मिळून ही ठिकठिकाणी कारवाई केली आहे.


......................................................................................................................................


(आमच्या बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला लाईक करा. आणि 'हिंजवडी टाईम्स' च्या न्यूज चॅनलला  Youtube  वर  बस्क्राईब करा )