आरक्षण असेल तिथं मूळ ओबीसी बांधवांनाच तिकीट देण्याची मागणी
पौड : ओबीसी बांधवांवर अन्याय होत असून राजकीय निवडणुकीत आरक्षण असेल तिथं ओबीसी बांधवांनाच तिकीट देण्याची मागणी मुळशी तालुक्यात करण्यात येत आहे.
या संदर्भात ओबीसी व
बहुजन समाजाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तालुक्यात होऊ घातलेल्या
जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षित गट व गणामध्ये सर्व
ओबीसी बांधवांनी खऱ्या ओबीसी उमेदवाराला पाठिंबा देण्याचा आणि पक्षभेद विसरून
एकत्र ओबीसी उमेदवाराच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
समाजातील सर्व
स्तरांतील कार्यकर्त्यांनी सांगितले की, गेल्या काही काळात
खोट्या कुणबी जात प्रमाणपत्रांवर उमेदवारी घेणाऱ्यांमुळे खऱ्या ओबीसींचा आवाज
दडपला गेला आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये
खऱ्या ओबीसी प्रतिनिधीला न्याय मिळवून देण्यासाठी व लोकशाहीचा पाया मजबूत
करण्यासाठी समाज एकत्र येणार आहे.
या मागणीला जे
राजकीय पक्ष प्रतिसाद देणार नाहीत त्यांना तीव्र परिणाम भोगावे लागतील असा इशारा या
बैठकीच्या निमित्ताने देण्यात आला. तसेच कुणबीसाठी जर शासनाला राजकीय आरक्षण
द्यायचे असेल तर ते ओबीसी आरक्षण मधून न देता ते स्वतंत्र द्यावे व राजकीय न देता
नोकरीं आणि शैक्षणिक द्यावे अशी मागणी करण्यात आली.
बैठकीला राष्ट्रवादी
काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, भाजप, आरपीआय व इतर पक्षाचे तालुक्यातील पदाधिकारी तसेच मूळशी
तालुक्यातील विविध गावांतील सर्व जाती मधील ओबीसी बांधव, युवक, महिलावर्ग व सामाजिक
कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीतून झालेला एकमुखी निर्णय पाहता आगामी
काळात मुळशी तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडण्याची शक्यता व्यक्त
केली जात आहे.
आरपीआय पक्ष मुळशी तालुक्यातील खऱ्या ओबीसी उमेदवारांच्या
पाठीशी खंबीरपणे उभा राहील. समाजाच्या न्यायासाठी हा लढा आता सर्वांच्या एकतेने
लढला जाईल.
- श्रीकांत कदम, नेते रिपाई, पुणे जिल्हा.
..............................................................................................................................................
(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स' सोबत Connected रहा.)
FACEBOOK, फेसबुक Click Blue Line
Follow us on INSTAGRAM इन्स्टाग्रामला फॉलोव्ह करा Click Blue Line
आमच्या चॅनेलला Follow करा. Click Blue Line.
