पिरंगुट : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त पिरंगुट येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले. पक्षाचा 57 वा वर्धापनदिन यानिमित्ताने उत्साहात साजरा करण्यात आला.
लवळे फाटा, पिरंगुट येथील मुळशी
स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राम गायकवाड
व शिवसेना उपतालुका प्रमुख वैभव पवळे यांच्या हस्ते रुग्णांना फळवाटप करून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना माजी उप तालुका
प्रमुख रामदास पवळे, शिवसेना विभाग प्रमुख दत्ता काळभोर, शिवसेना उपविभाग प्रमुख संभाजी ढमाले, माजी ग्रामपंचायत सदस्य मोहन शेठ आवळे, कासार आंबोली शाखाप्रमुख राहुल धुमाळ, रवींद्र गरुड आधी पदाधिकारी उपस्थित होते.
...............................................................................................................................................
(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला लाईक करा.)
तसेच आमच्या Whats app ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला click करा.