घोटवडेच्या आमलेवाडीत झालेला खून, आरोपींना मुठा गावाजवळ अटक
पौड : आमलेवाडी-घोटवडे, ता.मुळशी येथे झालेल्या खूनप्रकरणी पौड पोलिसांनी
पाच जणांना अटक केली आहे. यासाठी पोलिसांनी तीन पथके तयार करून तपासासाठी पाठवली
होती. मुठा गावच्या परिसरात या आरोपींनी अटक केली असून उर्वरीत आरोपींचा शोध चालू
आहे.
घोटावडे ते कोळवण रस्त्यावर आमलेवाडी पाटीजवळ
ओंकार भालचंद्र भिंगारे (वय २५, रा. उरवडे, ता. मुळशी जि. पुणे हल्ली रा. पिंपळे गुरव
पिंपरी चिंचवड) याचा जुन्या भांडणाचा राग मनात धरून १ सप्टेंबर रोजी तीक्ष्ण
हत्याराने वार करून खून करण्यात आला होता.
पौड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष
गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पोलीस तपास पथके तयार करण्यात आली होती. हे
पाच आरोपी लवासा रोड वरील मुठा गावात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस हवालदार
रॉकी देवकाते यांना मिळाल्याने सदर पोलीस पथके मुठा गावाच्या दिशेने जाऊन मुठा
घाटामध्ये सापळा रचून छापा मारला असता गणेश कैलास भंडलकर, सनी श्याम चव्हाण, अक्षय सुनील
उर्फ रघुनाथ शेलार, सचिन बाळू भंडलकर, परशुराम यल्लाप्पा कक्षागिरी (सर्व राहणार उरवडे ता.
मुळशी) यांना ताब्यात घेण्यात आले.
सदरची कमगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपअधिक्षक सुनीलकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस
निरीक्षक संतोष गिरीगोसावी, सहाय्यक पोलीस
निरीक्षक सुधीर कदम, बालाजी कांबळे, पोलीस उपनिरीक्षक योगेश जाधव, सुधीर घुले, पोलीस हवालदार
नितीन रावते, रॉकी देवकाते, रवींद्र नागटिळक, दीपक पालके, सिद्धेश पाटील, दत्तात्रय
अर्जुन, अंमलदार साहिल शेख, नवनाथ शिंदे या पथकाने केली.
...............................................................................................................
आमच्या Whats App ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला Click करा.
...............................................................................................................
(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला लाईक करा.)